Deepika Padukone
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा

मुंबई: एक अत्यंत मोठा असा खुलासा झाला की, ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे. हा ग्रुप २०१७ साली बनविण्यात आला होता. ज्यामध्ये जया शाह आणि करिश्मा प्रकाश यांचा देखील समावेश होता. याच ग्रुपमध्ये दीपिका आणि करिश्मा यांच्यात ड्रग्जविषयी चर्चा झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नार्कोटिक्स ब्युरोने व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना समन्स पाठविले आहेत. शुक्रवारी एनसीबीने रकुल प्रीत सिंग हिची चौकशी केली. ज्यामध्ये तिने कबूल केले की, तिचं रिया चक्रवर्तीशी ड्रग्जविषयी बोलणं झालं होतं. आता शनिवारी दीपिका पदुकोण एनसीबीसमोर हजर होणार असून तिची देखील याप्रकरणी चौकशी केली जाईल.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

One thought on “दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत