A mobile phone exploding in a pocket, causing injury to the person
देश

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी, जाणून घ्या स्फोट होण्याची कारणे आणि टाळण्याचे उपाय…

छत्तीसगड : खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना छत्तीसगडमधील बेमेतरा येथे २५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. लोलेसरा गावातील नीतीश कुमार वर्मा हे सोमनाथ धामच्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी जात होते. त्यांच्या पँटच्या खिशात ठेवलेला अँड्रॉइड मोबाईल अचानक गरम होऊ लागला आणि त्यांनी तो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता स्फोट झाला. या स्फोटामुळे त्यांचा हात आणि पाय गंभीरपणे भाजले. घटनेनंतर त्यांच्या मित्राने आग विझवण्यासाठी मातीचा वापर केला. नीतीश कुमार वर्मा यांना बेमेतरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची स्थिती सामान्य आहे. हा मोबाईल चार महिन्यांपूर्वी खरेदी केला होता आणि स्फोटापूर्वी तो 60% चार्ज झाला होता. संबंधित कंपनीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्थानिक प्रशासनाने नागरिकांना मोबाईलच्या सुरक्षित वापराबद्दल जागरूक केले आहे. तथापि, खिशात मोबाईलचा स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

मोबाईलचा स्फोट का होतो?
जर मोबाईल फोनची बॅटरी जास्त गरम झाली तर स्फोट होऊ शकतो. मोबाईलच्या बॅटरीतील पार्टस तुटल्यामुळेही त्याचा स्फोट होऊ शकतो. तसेच, उत्पादन दोषामुळे (मैनुफैक्चरिंग डिफेक्ट) फोनचा स्फोट होऊ शकतो.

या गोष्टींकडे लक्ष ठेवा :

  • जर फोन खूप गरम होत असेल तर सावध रहा आणि ताबडतोब तो सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा.
  • तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल तर काळजी घ्या. अशा स्थितीत मोबाईलचा स्फोट होऊ शकतो.
  • फोन चार्ज करण्यासाठी फक्त ओरिजनल चार्जर आणि केबल वापरा.
  • उष्णता असेल अशा ठिकाणी मोबाईल चार्जिंग करणे टाळा.
  • मोबाईलसाठी स्वस्त बॅटरी खरेदी करू नका.
  • फोनला जास्त चार्जिंग करू नका. बऱ्याचदा लोक त्यांचा फोन चार्जिंगला लावल्यानंतर विसरतात किंवा रात्रभर चार्जिंगला लावतात.
  • उशीखाली फोन ठेवून झोपू नका. यामुळे फोनचे तापमान वाढू लागते. अशा परिस्थितीत, फोन जास्त गरम झाल्यामुळे ब्लास्ट होऊ शकतो.
  • याशिवाय, चार्जिंग करताना फोनवर बोलू नका.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत