17 motorcycles seized from bike thief in red light area
पुणे महाराष्ट्र

पुणे : रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त

पुणे : पुण्यात रेड लाईट भागातील दुचाकी चोरणाऱ्या सराईताकडुन तब्बल 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या भागातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे पाहुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस अंमलदार ना. वैभव स्वामी व पो. ना. प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासुन ते देहु रोडपर्यंत आठ दिवसात तब्बल 150 ते 200 सी.सी.टी.व्ही कॅमेरे चेक केले. त्यानुसार त्यांनी भक्ती शक्ती चौकापर्यंतचे मोटारसायकल चोराचे सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करुन माग काढला, परंतु तेथुन पुढे आरोपी कोठे गेला याबाबत माहीती मिळत नव्हती. सदर आरोपी रात्रीच्या वेळी मोटारसायकल चोरी करुन जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

तपास पथकाचे पोलीस अंमलदार पो.ना वैभव स्वामी, पो.ना प्रविण पासलकर, पो.शि सुमित खुट्टे बुधवार पेठ भागात पेट्रोलींग करत असताना सी.सी.टी.व्ही फुटेज मधील मोटारसायकल चोरणाऱ्या व्यक्तीप्रमाणे एक संशयीत व्यक्ती दाणे आळी, बुधवार पेठ, पुणे येथे दिसुन आला. त्यांनी तात्काळ सदर व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला नाव व पत्ता विचारला. त्याने त्याचे नाव व पत्ता सोहेल युनुस शेख, वय 26 वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. पारसी चाळ, देहु रोड रेल्वे स्टेशन जवळ, थापा गॅरेजच्या पाठीमागे, देहु रोड, ता. मावळ, जि. पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली, त्यावेळी तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्याच्याकडे असलेल्या गाडीबाबत पोलिसांनी अधिक माहीती तपासली. त्यांना सदरच्या मोटारसायकल चोरीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले.

त्यानंतर, या व्यक्तीला सदर गुन्हामध्ये अटक करुन तपास पथकाचे अधिकारी संतोष शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास पथकाच्या सहाय्याने अधिक तपास केला आणि त्याच्याकडुन चोरीच्या 4,40,००० रुपये किंमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या असुन १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

  1. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 63/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 पीएम-4868
  2. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 76/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-38 आर-8891
  3. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 135/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 जेबी-7028
  4. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 170/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एलझेड-7342
  5. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 172/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एमवाय-1938
  6. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 176/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 केडब्ल्यु-4711
  7. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 182/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 जेव्ही-9769
  8. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 186/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एमयु-7328
  9. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 187/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-14 जीझेड-8543
  10. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 188/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एलएक्स-0121
  11. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 189/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-11 बीएक्स-6849
  12. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 192/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एफएच-0232
  13. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 193/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 एन आर 5408
  14. फरासखाना पेालीस स्टेशन गु.रजि.नं 194/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-12 आरजे-6641
  15. वाकड पेालीस स्टेशन, गु.रजि.नं 607/2022 भा.दं.वि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस
    गेलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-14 जीझेड-9643असे एकुण 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.
  16. उर्वरीत दोनगाडी मालकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करत असुन अधिक तपास संतोष शिंदे ,
    सहाय्यक पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस स्टेशन हे करत आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत