Veteran actor Arun Bali passed away
मनोरंजन

दुःखद! ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, मनोरंजन विश्वाला मोठा धक्का

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (७ ऑक्टोबर) निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हा मनोरंजन उद्योगासाठी मोठा धक्का आहे. ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ दीर्घकालीन न्यूरोमस्क्युलर आजाराने ग्रस्त होते. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या ऊतींवर हल्ला करते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरुण बाली शेवटचे आमिर खान आणि करीना कपूर स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसले होते. अरुण बाली यांनी 1989 मध्ये ‘दुसरा केवल’ मधून टीव्ही डेब्यू केला होता. यानंतर ते ‘चाणक्य’, ‘आहट’, ‘शक्तिमान’, ‘मायका’ आणि ‘देख भाई देख’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसले. याशिवाय अरुण ‘सौगंध’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘3 इडियट्स’ आणि ‘हे राम’ सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्येही दिसले आहेत. ‘कुमकुम प्यारा सा बंधन’ या हिंदी टीव्ही शोनंतर ते खूप प्रसिद्ध झाले.

अभिनेते अरुण बाली यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. 3 इडियट्स, केदारनाथ, पानिपत आणि टीव्ही शो कुमकुम: एक प्यारा सा बंधन, चाणक्य, दूसरा केवल, मेरीदा आणि आरोहण या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत