Maharashtra Weather Updates rain forecast Konkan Western Maharashtra Vidarbha
महाराष्ट्र

आज राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन

मुंबई : आज (७ ऑक्टोबर) राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील, यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तसेच, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत