Bus accident
देश

लग्नाला चालेल्या वऱ्हाडाची बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

डेहराडून : उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस लालढांगहून काडा तल्ला इथं जात होती. बिरोखाल येथील सीमडी बँडजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 50 वऱ्हाडी सामील होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. रात्रभर बचावकार्य सुरू होतं.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आपात्कालीन विभागाच्या केंद्रावर पोहोचले. घटनास्थळी SDRF ची पाठवण्यात आली. सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पुष्कर सिंह धामी यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत