Rahul Gandhi and other Congress leaders detained and kept at the Kingsway Police camp
देश

दिल्लीतील वातावरण तापलं! राहुल गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया गांधी मंगळवारी सकाळी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर काँग्रेसकडून नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शन केली जात आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी दिल्लीच्या विजय चौक परिसरात झालेल्या आंदोलनात राहुल गांधीही सहभागी झाले होते. राहुल गांधी याठिकाणी ठिय्या देऊन बसले होते. त्यामुळे पोलिसांनी काहीवेळापूर्वीच राहुल गांधी यांना ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेऊन किंग्सवे पोलीस छावणीत ठेवण्यात आले आहे.

ईडीकडून सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी केली जात आहे. सोनिया गांधी यांची इन कॅमेरा चौकशी केली जाणार आहे. सोनिया गांधी यांच्याकडून ईडी लेखी जबाब घेणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत