Marathi Actor Pradeep Patwardhan passes away
मनोरंजन

लोकप्रिय अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन यांचे निधन झाले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी आज (९ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम नेहमी स्मरणात राहील. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे.

नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, पोलीस लाईन, वन टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत