पुणे : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या FTII मधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अश्विन शुक्ला हा मुळचा गोवा येथील रहिवासी आहे. तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.




