selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक, लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर कॉलेजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर कचरा हस्तांतर केंद्र, औधच्या समोरील सार्वजनिक रोड या ठिकाणी चुकवुमेका केनेडी अन्यकोरा (Chukwuemeka Kennedy Anyakora) या नायजेरीयन व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीचे वय 44 वर्षे असून तो सध्या खडकी रेल्वे स्टेशनजवळ, खडकी येथे वास्तव्यास होता. ही व्यक्ती मुळ लगोस, नायजेरिया येथील आहे.

पोलिसांना या व्यक्तीच्या ताब्यात 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम ५४० मिलीग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ, 1000 रोख रक्कम आणि 500 रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण मिळुन कि रु 12,39,600 रुपयांचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने या व्यक्तीविरुध्द चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार मारुती पारधी यांच्याफिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शैलजा जानकर म. सहा पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर या करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखा, पुणे, पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा पुणे शहर, सहा पो आयुक्त गुन्हे १ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, संदिप जाधव, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना शेख, संदेश काकडे,नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत