मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एका वेदनादायक अपघाताची बातमी आली आहे. येथे प्रवाशांनी भरलेली बस संजय सेतू पूलावरून नदीत पडली. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नर्मदा नदीत पडली आहे. इंदूरहून महाराष्ट्राकडे पुण्यात जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावर संतुलन बिघडल्याने खाली पडली. सध्या 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने धामनोदच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी धामनोद पोलिस आणि खलटाका पोलिसांचा बंदोबस्त आहे, गोताखोर बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
खरगोन जिले के खलघाट में नर्मदा नदी पर बस गिरने से कई अनमोल जिंदगियों के निधन का हृदय विदारक समाचार प्राप्त हुआ।
ईश्वर से मृतकों की आत्मा को शांति और परिजनों को यह दुःख सहन करने की शक्ति देने की प्रार्थना करता हूं: CM
— CMO Madhya Pradesh (@CMMadhyaPradesh) July 18, 2022
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सकाळी झालेल्या बस अपघाताची दखल घेतली आहे. बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाला लवकरात लवकर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांनी एसडीआरएफ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याशिवाय घटनास्थळी आवश्यक साधनसामग्री पाठवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री खरगोन, इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.




