मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एका वेदनादायक अपघाताची बातमी आली आहे. येथे प्रवाशांनी भरलेली बस संजय सेतू पूलावरून नदीत पडली. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नर्मदा नदीत पडली आहे. […]

