संगमनेर : आजकाल जीममध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. एखाद्या नायकासारखी आपलीही शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. त्यामुळेच आता हळूहळू खुल्या व्यायामशाळांचा अर्थात ‘ओपन जीम’चा ट्रेंड निर्माण होऊ लागला आहे.
याच गोष्टीचा विचार करून माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांचे यशोधन कार्यालय संगमनेर आणि माननीय इंद्रजीत भाऊ थोरात संचालक संगमनेर सहकारी साखर कारखाना तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक माननीय गणपतराव सांगळे, राजहंस दूध संघाचे व्हॉइस चेअरमन श्री राजेंद्र चकोर यांचे मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत कार्यालय शिबलापूर यांचे सहकार्याने शिबलापूर येथे व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून ओपन जिम साहित्य सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल शिबलापूर येथील शाळेच्या प्रांगणात बसविण्यात आले आहे. माननीय ना. बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर येथील यशोधन कार्यालय, तसेच ग्रामपंचायत शिबलापूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून जिम साहित्य बसवण्यात आले. यासाठी श्री. प्रमोद बोंद्रे, सौ. यमुना नागरे आणि सौ. अनिता म्हस्के या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
माजी सरपंच दिलावर शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, ओपन जिमचा फायदा तरुणांना मोठ्या प्रमाणात होईल. बरेच तरुण पोलीस, मिलिट्रीच्या भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, पण जिम नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या ओपन जिमचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. माननीय ना. बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर येथील यशोधन कार्यालय, जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून या जिम साहित्यासाठी मोठी मदत झाली. त्यासाठी शिबलापूर ग्रामस्थ विशेष आभारी आहेत.
या उद्घाटनाच्या प्रसंगी सरपंच सचिन गायकवाड, उपसरपंच दिलीप मुन्तोडे, माजी सरपंच दिलावर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे, प्रदीप मुन्तोडे, रमेश मुन्तोडे, पंढरीनाथ नागरे, नवनाथ नागरे, प्रा. जाधव सर, निशिकांत बर्डे, राजेंद्र सुखदेव नागरे, ज्ञानदेव नागरे, विश्वास मुन्तोडे, बाळासाहेब मुन्तोडे, नंदकुमार वालझाडे, महेश नागरे, अन्सार सय्यद, विक्रम नागरे, सुभाष मुन्तोडे, भाऊसाहेब नागरे, हौशीराम पाबळ, संजय नागरे, गंगाराम नागरे, भाऊसाहेब मैंदड, संजय रक्टे, विशाल मुन्तोडे, हरिभाऊ रक्टे, बाळासाहेब नागरे, श्रीकांत मुन्तोडे, प्रशांत फुलपगार, वसंत मुन्तोडे, पद्माकर पाचरणे, निवृत्ती नागरे, प्रवीण नागरे, जिजाबा नागरे, भाऊसाहेब मुन्तोडे, हरिभाऊ वालझाडे, जालिंदर बोंद्रे, चेतन म्हस्के, रमेश म्हस्के, सत्तार शेख, भैय्या शेख, रियाज शेख, डॉ. अण्णासाहेब नागरे, किरण मुन्तोडे, मधुकर मुन्तोडे यशोधन कार्यालयाचे जनसेवक श्री. वेणुनाथ सानप आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.




