justice for sushant singh rajput
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडणार..?

सुशांतच्या घरात काम करणारा दिपेश सावंत सीबीआयसाठी माफीचा साक्षीदार होणार आहे. दिपेशने सुशांत आणि रिया यांच्यात ८ जून रोजी वाद झाल्याची माहिती सीबीआयला दिली.सीबीआयने दिपेशला मुंबईतील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. तिथून बाहेर पडण्यास त्याला सक्त मनाई आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य लवकरच उलगडण्याची शक्यता आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाला आणि रियाने घरातले आठ हार्ड ड्राइव्ह नष्ट केले. यानंतर रिया घरातून निघून गेली. ही घटना ८ जून रोजी घडली. या घटनेनंतर रात्री उशिरा मालाडमध्ये सुशांतची एक्स मॅनेजर दिशा हिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचे वृत्त आले. मात्र या घटनेमुळे सुशांत अस्वस्थ झाला. अशी माहिती आता सिद्धार्थ आणि दिपेशच्या चौकशीतून पुढे आली आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करुन आत्महत्येचा आभास निर्माण करण्यात आला याचा तपास सीबीआय करत आहे.

सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या इडीने रियाचा मोबाइल जप्त केला होता. इडीने तिच्या मोबाइलमधील व्हॉट्सअॅपचे अनेक डिलिट झालेले संदेश परत मिळवले. या संदेशांवरुन सुशांतला खाण्यापिण्याच्या पदार्थांतून अंमली पदार्थ दिले जात होते ही बाब उघड झाली.

अनेकदा रिया व्हॉट्सअॅपवरुन विशिष्ट अंमली पदार्थ मागवत होती अशी माहिती उघड झाली आहे. रिया चक्रवर्ती, दिपेश सावंत, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, रियाची मॅनेजर श्रुती मोदी तसेच आणखी काही जणांमध्ये अंमली पदार्थांबाबत व्हॉट्सअॅप चॅट सुरू होते. ही माहिती हाती येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथक सक्रीय झाले आहे. त्यांनी एक गुन्हा दाखल करुन घेतला आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. रियाच्या रक्ताची आणि आवाजाची चाचणी केली जाईल. तसेच तिचे मेडिकल रिपोर्ट देखील तपासले जातील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत