Four women from the same family were raped
क्राईम देश

रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर बलात्कार

नवी दिल्ली : द्वारका येथील सीतापुरी बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडण्यासाठी मदत मागणाऱ्या 20 वर्षीय अंध तरुणीवर एका पुरुषाने बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, त्याच भागातील 24 वर्षीय आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिस उपायुक्त (द्वारका) शंकर चौधरी यांनी सांगितले की, “तरुणीला बसमधून विकासपुरी येथे उतरायचे होते, मात्र ती चुकून सीतापुरी स्टँडवर उतरली. त्यानंतर जेव्हा तिने स्थानिकांकडे रस्ता ओलांडण्यास मदत मागितली, तेव्हा आरोपीने तिला एका निर्जन गल्लीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर, पीडितेने कशीबशी विकासपुरीला जाणारी बस पकडली आणि घरी पोहोचली. महिलेवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातून अहवाल आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.”

डीसीपी पुढे म्हणाले की, पीडितेवर उपचार करणाऱ्या डाबरी येथील रुग्णालयाने त्यांना बलात्काराबाबत सांगितले. तपास अधिकारी पीडितेला भेटले तेव्हा तिने सांगितले की एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. डाबरी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर डिजिटल आणि तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. २४ वर्षीय चेतन खन्ना असे आरोपीचे नाव आहे, तो तेथील चाणक्य प्लेसमध्ये राहतो.”

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पीडितेची भेट घेतली आणि तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत