From July 1 Changes In The Rules Related To Banking And Tax, Buying Cars And Bikes Become Expensive
अर्थकारण देश

आजपासून अनेक नियमांमध्ये होणार मोठे बदल, खिशावर होणार थेट परिणाम

मुंबई : आज १ जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. 1 जूनपासून एसबीआय कडून गृहकर्ज घेणे आणि वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महाग होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे. याबरोबरच अन्य होणाऱ्या बदलांबद्दल आपण जाणून घेऊयात…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

SBI कडून गृहकर्ज घेणे महागले
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या गृहकर्ज बाह्य बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) मध्ये 40 बेसिस पॉइंट्सने 7.05% पर्यंत वाढ केली आहे, तर RLLR 6.65% अधिक क्रेडिट जोखीम प्रीमियम (CRP) असेल. वाढलेले व्याजदर 1 जूनपासून लागू झाले आहे. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढतील. पूर्वी EBLR 6.65% होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25% होता.

अ‍ॅक्सिस बँक बचत खाते नियमांमध्ये बदल
अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यावरील सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या अंतर्गत, निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना 15,000 ऐवजी किमान 25,000 रुपये किंवा अ‍ॅक्सिस बँकेच्या सर्व प्रकारच्या बचत खात्यांमध्ये 1 लाख रुपयांची मुदत ठेव ठेवावी लागेल.

PMJJBY आणि PMSBY प्रीमियम वाढला
केंद्र सरकारने मंगळवारी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दर 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. हे नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत.

गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा
सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता 256 जुन्या जिल्ह्यांव्यतिरिक्त 32 नवीन जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र उघडण्यात येणार आहेत. आता या सर्व 288 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक झाले आहे. आता या जिल्ह्यांमध्ये केवळ 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दागिने विकता येतील. हॉलमार्किंगनंतरच त्यांची विक्री करता येणार आहे.

वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स महागला
इतर मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागला आहे. म्हणजेच, आता तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल. दुचाकींच्या बाबतीत, 150 सीसी ते 350 सीसी दरम्यानच्या वाहनांसाठी प्रीमियम 1,366 रुपये असेल, तर 350 सीसीपेक्षा जास्त वाहनांसाठी प्रीमियम 2,804 रुपये असेल. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गॅस सिलिंडर झाले स्वस्त
एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन किंमत जाहीर झाल्यानंतर, गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 2,219 रुपये, मुंबईत 2,171.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत