पुणे : पुण्यात जुन्या वादातून तिन मित्रांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मंगेश किशोर शिंगाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, खून करून पळुन जाताना गुन्हे शाखेने या आरोपींना शिताफीने पकडुन अवघ्या 10 तासात अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी भेकराइनगर बस डेपो शेजारी फुरुसंगी येथे अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरुन मंगेश
किशोर शिंगाडे (रा. पापडेवस्ती, भेकराईनगर, पुणे) याला लोखंडी कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार करुन जीवे ठार मारले. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला. दाखल गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करुन व युनिट कडील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, भेकराईनगर येथे राहणारे किरण धोत्रे, प्रशांत हिरेमठ व अजय माने या तिघांनी मंगेश शिंगाडे याचा खुन केलेला आहे. तसेच ते तिघे लोणी टोलनाका येथे थांबलेले असुन ते तेथुन प्रशांत याच्या गावी कर्नाटक येथे जाणार आहे.
बातमी मिळताच पोलिसांनी योग्य ती कार्यपध्दती वापरून योजना बनवली. त्यानंतर आरोपी किरण विठ्ठल धोत्रे (वय १९), प्रशांत शंकर हिरेमठ (वय 19), अजय सचिन माने (वय 20) यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन मंगेश शिंगाडे याला मारल्याचे त्यांनी कबूल केले. दरम्यान, हा गुन्हा युनिट-5 गुन्हे शाखेने केलेल्या कौशल्यपुर्ण तपासामुळे अवघ्या 10 तासात उघडकीस आला आणि आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींची नावे :
- किरण विठ्ठल धोत्रे (वय १९, रा. यादव चाळ, भावना हॉस्पीटलच्या मागे, भेकराईनगर, हडपसर)
- प्रशांत शंकर हिरेमठ (वय 19, रा.पापडे वस्ती, राजगड कॉलणी, ढमाळवाडी, हडपसर)
- अजय सचिन माने (वय 20, रा. त्रिवेणी कॉलनी, सिया हाईटसच्या बाजुला, भेकराईनगर बस डेपो जवळ, हडपसर)
ही उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अतिरिक्त कार्यभार, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, भाग्यश्री नवटके, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे,
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, दया शेगर, दाऊद सय्यद, दत्तात्रय ठोंबरे, संजयकुमार दळवी यांनी केली आहे.




