Action will be taken against those who encroach in Mandvi forest reserve of Palghar district
महाराष्ट्र मुंबई

पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणार

पालघर : पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात मौजे शिरवली वनजमिनीवर सुरू असलेल्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मांडवी वनपरिक्षेत्रातील चंद्रपाडा, खैरपाडा, टोकरेपाडा, मालजीपाडा या भागात असलेल्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून अवैधरित्या उत्खनन करणे, झाडे तोडणे, अनाधिकृत रस्ते बनविणे या तक्रारींबाबत वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिल्या. या बैठकीला मुख्य वनसंरक्षक रामाराव, उपवनसंरक्षक एस.मधुमिता, पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य राजाराम मुळीक, अरविंद बेर्डे उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत