sanjay raut
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तर मी संपत्ती भाजपाला दान करेल… ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया…

मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन शब्दांचं ट्विट करत ते म्हणाले की असत्यमेव जयते!! त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी कष्टाने कमावलेली ईडीने संपत्ती जप्त केली आहे. त्यानंतर ते म्हणाले की संपत्ती गौण आहे. सूडाच्या कारवायांना मी घाबरत नाही. एक रुपयाही अवैध मार्गाने जमा झालेला असेल तर मी संपत्ती भाजपाला दान करेल. आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन. तसेच राहत्या घरावर कारवाई झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ईडीच्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही समर्थ आहोत असंदेखील ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. ईडीच्या या कारवाईबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, संपत्तीचा अर्थ काय? मी नीरव मोदी, विजय मल्ल्या की मी अंबानी-अदानी? मी राहतो ते घर छोटंसं घर आहे. अलिबाग हे माझे मूळ गाव आहे, तिथे एक एकरही जमीन नाही. जे काही घेतले आहे ते आमच्या कष्टाच्या पैशातून घेतले आहे. ही मालमत्ता 2009 मध्ये घेण्यात आली आहे. मात्र ही मनी लाँड्रिंग असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणेला वाटते. मात्र राजकीय सूडबुद्धीच्या भावनेतून हे घडत आहे.

आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, मी राज्यसभा अध्यक्षांना आधीच माहिती दिली होती की महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. अन्यथा तुम्हाला केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सामोरे जावे लागेल, असे बोलले जात आहे. पण आम्ही घाबरत नाही. आम्ही घाबरणारे नाही. आमची संपत्ती जप्त करा, आम्हाला गोळ्या घाला किंवा तुरुंगात पाठवा… संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य, शिवसैनिक आहेत, ते लढत राहतील आणि तुमचा पर्दाफाश करत राहतील. दोन वर्षांपासून ही कारवाई सुरू आहे, मी गप्प बसलो नाही, असे राऊत म्हणाले. ज्याला नाचायचे आहे त्याला नाचू द्या, सत्य काय आणि खोटे काय हे येत्या काळात कळेल.

वास्तविक हे प्रकरण पत्रा चाळ जमीन घोटाळ्याचे आहे. ज्यामध्ये ईडीने आधीच कारवाई केली आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्याशी संबंधित काही भूखंड आणि फ्लॅटचीही चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची ईडी मनी लाँड्रिंग संदर्भात चौकशी करत आहे. याच प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचा जवळचा सहकारी प्रवीण राऊत यालाही अटक केली आहे. संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरून सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत