युक्रेनमध्ये यूएस येथील चित्रपट निर्माता आणि पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनच्या अधिकार्यांनी पत्रकाराच्या मृत्यूसाठी रशियाला जबाबदार धरले आहे, परंतु त्याच्या मृत्यूबाबतची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. पत्रकार ब्रेंट रेनॉडचा इरपिन येथे मृत्यू झाला, असे कीव इंडिपेंडंटने कीव ओब्लास्ट पोलिसांचे प्रमुख आंद्री नेबिटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असा दावा अँड्री नेबिटोव्ह यांनी केला.
रेनॉडच्या शरीरावर सापडलेल्या कागदपत्रांमध्ये न्यूयॉर्क टाइम्सचे ओळखपत्र होते. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले की “ब्रेंट रेनॉडच्या मृत्यूबद्दल ऐकून आम्हाला खूप दु:ख झाले. ब्रेंट हा एक प्रतिभावान चित्रपट निर्माता होता. ज्याने न्यूयॉर्क टाइम्समध्ये गेल्या काही वर्षांत योगदान दिले होते. जरी त्याने भूतकाळात (सर्वात अलीकडे 2015 मध्ये) द टाइम्समध्ये योगदान दिले असले तरी, तो सध्या युक्रेनमधील द टाइम्स येथे कोणत्याही डेस्कसाठी असाइनमेंट करत नव्हता. त्याने टाइम्ससाठी काम केल्याचे सुरुवातीचे अहवाल प्रसारित झाले, कारण त्याने टाइम्स प्रेस बॅज घातलेला होता जो त्याला काही वर्षांपूर्वी असाइनमेंटसाठी जारी केला गेला होता.”
Response from a New York Times spokesperson in regard to the death of Brent Renaud in Ukraine. pic.twitter.com/K11eW685yr
— NYTimes Communications (@NYTimesPR) March 13, 2022




