US-based filmmaker and journalist shot dead in Ukraine
ग्लोबल

युक्रेनमध्ये यूएसच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या

युक्रेनमध्ये यूएस येथील चित्रपट निर्माता आणि पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी पत्रकाराच्या मृत्यूसाठी रशियाला जबाबदार धरले आहे, परंतु त्याच्या मृत्यूबाबतची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. पत्रकार ब्रेंट रेनॉडचा इरपिन येथे मृत्यू झाला, असे कीव इंडिपेंडंटने कीव ओब्लास्ट पोलिसांचे प्रमुख आंद्री नेबिटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना […]

russia declares ceasefire announces opening humanitarian corridors evacuation of civilians
ग्लोबल

रशियाकडून युद्धविराम घोषित! अडकलेले लोक बाहेर पडेपर्यंत हल्ला करणार नसल्याचे आश्वासन

रशिया – युक्रेन युद्ध : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये 10 दिवस चाललेल्या युद्धादरम्यान रशियाने युद्धविराम घोषित केला आहे. यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रशियाने म्हटले आहे की रशियाने नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यासाठी ७ वाजेपासून युक्रेनमध्ये युद्धविराम घोषित केला आहे. भारतीय वेळेनुसार […]

ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
ग्लोबल

मी कीवमध्येच आहे, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केले देश सोडल्याच्या वृत्ताचे खंडन

नवी दिल्ली : युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युक्रेनमध्ये रशियन हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन कीवमधील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देश सोडल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्यालयातून काम करत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी हे […]

indian students taken hostage by ukraine forces says russia
देश

सरकार आपले काम करत आहे, पुतीन यांना युद्ध थांबवण्याच्या सूचना देऊ शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा चालवले जात आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावे यासाठी एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, भारत सरकार भारतीयांना […]

All five students from Akola district studying in Ukraine are in a safe place
महाराष्ट्र

युक्रेनमध्ये शिकणारे अकोला जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

अकोला : शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच आहे व या सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क झाला असून हे विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर हा विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करुन सध्या पोलंड येथे भारतीय दुतावासाच्या नियंत्रणात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. हुसेनउल्ला […]