the new strain of corona found in Maharashtra being more dangerous
कोरोना ग्लोबल

चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, अनेक शहरांना रेड अलर्ट

चीन : चीनच्या ज्या शहरात कोरोना विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता, त्या वुहान शहरात कोरोना पुन्हा एकदा जोर धरताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत वुहानमध्ये कोरोनाचे ५२६ रुग्ण आढळून आलेत. गेल्या दोन वर्षांतील एका दिवसाच्या संक्रमणाचा हा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत कोरोनाच्या ५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाल्यानं चीनच्या ‘कोव्हिड झिरो धोरणा’ला जोरदार झटका बसला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ५२६ रुग्णांपैंकी २१४ रुग्णांत कोरोनाची स्पष्ट लक्षणं आढळून असून ३१२ रुग्णांत कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. वुहानमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत संक्रमित आढळून आल्यानंतर चीनच्या शांघाय, कवान्डांगसहीत अनेक शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसंच नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि कोविड नियम पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संक्रमितांच्या आकड्यात झालेल्या वाढीनंतर नागरिकही सतर्क झाले आहेत.

आतापर्यंत जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येनं ४४.६५ कोटींचा आकडा पार केला आहे. मृतांचा आकडाही ६० लाखांच्या जवळपास पोहचला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत