रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढीनंतर अनेक बदल केले आहेत. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, जिओने एक योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्ही अमर्यादित इंटरनेट वापरू शकता आणि कॉल करू शकता. तुम्हाला हवा तितका डेटा वापरायचा असेल, तर Jio चा हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज वापरल्या जाणार्या डेटावर कोणतीही मर्यादा नाही. तसेच, जिओचा हा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना एक महिन्याची म्हणजेच पूर्ण ३० दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लॅनची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे, तर चला जाणून घेऊया जिओच्या या प्लॅनमध्ये आणखी कोणते फायदे आहेत.
जिओच्या २९६ रुपयांच्या प्लॅनचे फायदे
रिलायन्स जिओचा हा प्लॅन जिओच्या फ्रीडम प्लॅन्स श्रेणी अंतर्गत येतो. Jio च्या या प्लान मध्ये 25GB डेटा मिळतो. विशेष बाब म्हणजे या डेटामधून तुम्ही दररोज कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज किती डेटा खर्च केला जाऊ शकतो यावर मर्यादा नाही. जिओचा हा एकमेव प्लान आहे ज्यामध्ये कोणतीही दैनिक डेटा मर्यादा नाही.
जिओच्या 296 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही अमर्यादित कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे (Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud) मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.




