Elephant herd gets trapped in Karnataka canal, rescued by forest officials
देश

मानवनिर्मित कालव्याने वन्य प्राण्यांना धोका, हत्तींच्या कळपाला कालव्यातून बाहेर पडता येईना, घटनेचा व्हिडिओ आला समोर…

कर्नाटक : माणसाने केलेला विकास अनेकदा वन्य प्राण्यांना धोका निर्माण करतो. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर हत्तींचा कळप कालव्यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची घटना सोमवारी घडलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, कालव्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या हत्तींच्या व्हिडिओने आता गंभीरपणे विचार करायला भाग पाडले आहे. सोशल मीडिया साइट्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात असलेल्या व्हिडिओमध्ये, मानवनिर्मित कालव्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात पाच हत्ती अनेक वेळा घसरताना दिसत आहेत.

भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहिले की “हत्तींच्या कॉरिडॉरमधील या पायाभूत सुविधा त्यांच्या मर्यादा तपासत आहेत. आम्ही भाग्यवान आहोत की त्यांना नंतर वनविभागाने वाचवले.”

कर्नाटकच्या वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी म्हैसूर जिल्ह्यातील हुन्सूर तालुक्यातील हनागोडू गावात लक्ष्मण तीर्थ नदीच्या कालव्यात ही घटना घडली. गावकऱ्यांनी हत्तींचा पाठलाग केला, मात्र हत्तींचा कळप कालव्यात अडकला होता. येथे पाण्यामुळे आणि निसरड्या किनार्‍यामुळे हत्तींना कालव्यातून बाहेर पडता येत नव्हते. गावकऱ्यांच्या एका गटाने हत्तींचा पाठलाग केला आणि शेवटी अशी जागा मिळाली जेथून हे हत्ती कालवा पार करू शकले. या घटनेत हत्तींना कोणत्याही प्रकारे इजा झाली नाही. कालव्यातून बाहेर पडल्यानंतर हा हत्तींचा कळप नागरहोल व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यात यशस्वी झाला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत