प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सर्व राजकारणी आणि कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
अरबिंदो इस्पितळातील डॉक्टर विनोद भंडारी यांनी सांगितले की, ‘राहत इंदौरी आधीपासून अनेक आजारांनी ग्रस्त होते. दोनदा हृदयविकाराचे झटके आला, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. डॉक्टर पुढे म्हणाले की, त्यांना ६० टक्के निमोनिया होता. याशिवाय त्यांचं ७० टक्के यकृत खराब होतं, करोना पॉझिटिव्ह होते, हायपर टेन्शन आणि मधुमेहाचाही त्रास होता.’




