125 passengers of an international chartered flight from Italy have tested positive for Covid-19
देश

कोरोनाचा विस्फोट! इटलीहून भारतात आलेल्या फ्लाइटमधील 170 पैकी 125 जण कोरोना पॉझिटिव्ह

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्ड फ्लाइटमध्ये १२५ जणांना कोरोनाची लागण झालेली असल्याचे आढळून आले आहे. या फ्लाइटमध्ये 170 लोक होते असे सांगण्यात येत आहे. या सर्व लोकांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अमृतसर विमानतळाचे संचालक व्हीके सेठ यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अगोदर हे विमान एअर इंडियाचे असल्याचे बोलले जात होते. मात्र, सध्या रोमहून एअर इंडियाचे एकही विमान भारतात येत नसल्याचे एअर इंडियाने सांगितले आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 56.5 टक्के जास्त कोरोना रुग्ण आढळले.

या पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये महाराष्ट्र (26,538 नवीन कोरोना प्रकरणे), पश्चिम बंगाल (14,022 प्रकरणे), दिल्ली (10,665 प्रकरणे), तामिळनाडू (4,862 प्रकरणे) आणि केरळ (4,801 प्रकरणे) यांचा समावेश आहे. नवीन 90,928 प्रकरणांपैकी 66.97 टक्के प्रकरणे फक्त पाच राज्यांमधून आली आहेत. यामध्ये केवळ 29.19 टक्के प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. या 5 राज्यांमध्ये देशातील एकूण प्रकरणांपैकी 66% प्रकरणे आढळून आली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत