देश महाराष्ट्र

राम मंदिर भूमिपूजनानिमित्त बाळासाहेबांची आठवण, #DhanyawadBalasaheb हॅशटॅग होतोय ट्रेण्ड

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली जात आहे. एकीकडे शिवसेना तसंच इतर नेते बाळासाहेबांच्या आठवणी शेअर करत असताना ट्विटरवर देखील बाळासाहेब ठाकरेंचं नाव चर्चेत आहे. ट्विटरला भूमिपूजनानिमित्त अनेक ट्रेंड होत असून यामध्ये #DhanyawadBalasaheb टॉप ट्रेंडमध्ये आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे त्यामध्ये बाळासाहेबांचीही मोलाची भूमिका असल्याचं सांगत नेटकरी त्यांचे आभार मानत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत.

बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे येऊन या घटनेची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या भूमिकेवरुन देशभरात वादळ उठलं होतं. मात्र या घटनेनंतर शिवसेना या पक्षाची हिंदुत्ववादी संघटना ही ओळख समोर आली. ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ हा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला नारा याच काळातला होता. त्यामुळे अयोध्या प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांचं एक अनोखं नातं होतं. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारण्यासाठी जे भूमिपूजन केलं जातं आहे त्या ठिकाणी शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाची माती घेऊन उपस्थित झाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत