Miss universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. हे विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाझ ‘Miss Universe 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. भारतासाठी तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझने विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता.
70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये हरनाजने 79 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला. मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका ललेला मसवाने होती. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्याची संधी मिळाली. ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती.
The new Miss Universe is…India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
हरनाझ संधू चंदीगडची रहिवासी असून ती मॉडेल आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे.
चंदीगडच्या हरनाज संधूने अलीकडेच ‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021’चा किताब जिंकला होता. तेव्हापासून तिने मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
हरनाझने मिळवलेले किताब
2017 – टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 – मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 – फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 – मिस युनिवर्स इंडिया
2021 – मिस युनिवर्स




