CDS-general-rawat
देश

तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस जनरल रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची हवाईदलाची माहिती

तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातातून आतापर्यंत तीन जनांना वाचवण्यात यश आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये बिपिन रावत, त्यांची पत्नी, एक ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी, आणखी एक अधिकारी आणि दोन पायलट होते. या सर्वांना उपचारासाठी वेलिंग्टन तळावर नेण्यात आले आहे. अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत