कॉमन सर्व्हिस सेंटरने व्हॉट्सऍपच्या सहकार्याने एक नवीन हेल्पलाइन सुरू केली आहे. ज्याचे नाव ‘CSC Health Services Helpdesk’ आहे. डिजिटल टेलिकन्सल्टेशन सोल्यूशन हे देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी आहे. त्यांना विविध सेवांसाठी एक एकीकृत हेल्पडेस्क प्लॅटफॉर्म प्रदान करेल.
यामध्ये प्रशासनाकडून मदत घेणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, कोविड-19 शी संबंधित संसाधनांमध्ये प्रवेश करणे आणि वापरकर्त्यांच्या इतर प्रश्नांचे निराकरण करणे समाविष्ट आहे. सीएससी हेल्थ सर्व्हिस हेल्पडेस्क व्हॉट्सअॅपवर मोफत उपलब्ध आहे. ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. CSC हेल्पडेस्क इन्फोबिप टेक्नॉलॉजीजने विकसित केले आहे.
CSC हेल्पडेस्क कसे वापरावे?
CSC हेल्पडेस्क वापरण्यासाठी, वापरकर्त्यांना +917290055552 या क्रमांकावर Hi लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागेल. वापरकर्ते इच्छित असल्यास https://wa.me/917290055552/ या लिंकद्वारे चॅटमध्ये प्रवेश देखील करू शकतात.
CSC Empowering Citizens Under #DigitalIndia…#CSC launched a dedicated helpline on #WhatsApp called ‘CSC Health Services Helpdesk’ on @WhatsApp to provide a digitally inclusive teleconsultation solution for people including in rural and remotest parts of India.#AmritMahotsav pic.twitter.com/QR7Ce8oNAb
— CSCeGov (@CSCegov_) December 3, 2021
आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका
सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे सीईओ दिनेश कुमार त्यागी म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा आणि इतर सेवांचा सर्वोत्कृष्ट लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. CSC ची टेलीहेल्थ कन्सल्टन्सी तळागाळात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात महत्त्वाची ठरली आहे. आम्हाला खात्री आहे की व्हॉट्सअॅप आम्हाला याचा विस्तार करण्यात मदत करेल.




