turkish photographer mehmet aslan photo syria war photo of the year award
ग्लोबल

फोटो ऑफ द इयर! ‘या’ बाप-लेकाचा आनंद अनेकांना प्रेरणा देणारा

तुर्कीचे छायाचित्रकार मेहमत अस्लान (Mehmet Aslan) यांनी एक असे छायाचित्र टिपले आहे, जे पाहून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळेल. या छायाचित्रात केवळ भावूक करण्याचीच नाही तर हरलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्याची ताकद आहे. या चित्रातून बाप-लेकाचे प्रेम दाखवण्यात आले आहे, जे लाखो संकटांमध्येही हसत आहेत. या छायाचित्राला वर्षातील सर्वोत्कृष्ट फोटो म्हणून निवडण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मेहमत अस्लानचे हे छायाचित्र सीरिया-तुर्की सीमेवर हैते प्रांतातील रेहनाली येथे राहणाऱ्या सीरियन निर्वासित पिता-पुत्राचा आनंद दाखवत आहे. वडील आणि मुलगा दोघेही अपंग आहेत, तरीदेखील ते आनंदी असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. म्हणूनच सिएना इंटरनॅशनल अवॉर्ड्स 2021 मध्ये या छायाचित्राची ‘फोटो ऑफ द इयर’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

या छायाचित्रातील वडिलांना सीरियाच्या बाजारात झालेल्या बॉम्बस्फोटात पाय गमवावा लागला, तर गृहयुद्धादरम्यान गर्भवती पत्नी विषारी वायूच्या संपर्कात आली, ज्यामुळे त्यांचा मुलगा हातपाय नसलेल्या स्थितीत जन्माला आला. वडिलांना एक पाय नाही तर मुलाला दोन्ही हात पाय नाहीत, तरीही दोघेही हसत आहेत. मेहमत अस्लान यांनी वडील आणि मुलाचा हाच आनंद आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत