chef killed by snake bite 20 minutes after chopping its head off
ग्लोबल

शेफने सूप बनवण्यासाठी कापला कोब्रा सापाचा फणा, २० मिनिटांनी कापलेल्या फ़ण्याने केला शेफला दंश…

चीन : दक्षिण चीनमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका रेस्टॉरंटमध्ये एका शेफने कोब्रा सापाचा फणा (डोके) कापून बाजूला ठेवले. यानंतर शेफने त्या सापाचे सूप बनवण्याची तयारी सुरू केली, सुमारे 20 मिनिटांनंतर, या शेफने सापाचे कट केलेले डोके फेकण्यासाठी उचलताच त्याला जोरदार धक्का बसला. कट केलेल्या सापाच्या फ़ण्याने त्याला दंश केला होता, ज्यामुळे त्या शेफचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात राहणारा शेफ पेंग फॅन हा इंडोचायनीज स्पिटिंग कोब्रा सापापासून बनवलेले सूप तयार करत होता. शेफ पेंग फॅनने स्पिटिंग कोब्राचा फणा कापून बाजूला ठेवला. त्यानंतर, सापाचे सूप बनवण्यासाठी शेफला 20 मिनिटे लागली. यानंतर शेफने किचन स्वच्छ ​​करायला सुरुवात केली. त्यासाठी शेफने सापाचा कापलेला फणा कचरापेटीत फेकण्यासाठी उचलला, यावेळी शेफला सापाच्या कापलेल्या फ़ण्याने चावा घेतला. दरम्यान, शेफला विषारी साप चावल्याने रेस्टॉरंटमध्ये एकच खळबळ उडाली. आरडाओरडा सुरु झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले, पण डॉक्टरांची टीम मदतीसाठी येण्याअगोदरच शेफचा मृत्यू झाला होता.

विषारी कोब्रा सापापासून बनवलेले सूप चीनमध्ये खूप पसंत केले जाते. हे सूप बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असते. तथापि, या प्रकरणातील तज्ञांचे म्हणणे आहे की साप आणि इतर सरपटणारे प्राणी मारल्यानंतरही तासभर प्रतिक्रियाशील हालचाली करू शकतात. कोब्राच्या थुंकीचे विष विशेषतः अतिशय वाईट असते. त्यात न्यूरोटॉक्सिन्स असतात, ज्यामुळे 30 मिनिटांच्या आत मरण येते किंवा अपंगत्व येऊ शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत