India beat England by 151 runs to take 1-0 lead in 5-match series
क्रीडा

IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडविरुद्ध मोठा विजय

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 151 रनने जिंकला. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. बुमराह आणि शमीने इंग्लंडच्या दोन्ही ओपनरना माघारी धाडलं. रोरी बर्न्स आणि डॉमनिक सिबली हे दोन्ही ओपनर शून्यवर आऊट झाले. यानंतर जो रूटने हसीब हमीदसोबत चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला, पण इशांत शर्माने हमीदला आऊट केले. त्यानंतर चहापानाच्या आधीच्या बॉलवर इशांत शर्माने जॉनी बेयरस्टोला एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर अखेरच्या सत्रात भारताला विजयासाठी 6 विकेटची गरज होती, तर इंग्लंडला 205 धावांची गरज होती.

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने सुरुवातीच्या तीन विकेट लवकर गमावल्या, पण अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी पार्टनरशीप करून भारताची पडझड थांबवली. अजिंक्य रहाणे 61 रनवर तर चेतेश्वर पुजारा 45 रन करून आऊट झाले. पाचव्या दिवसाची सुरुवात भारताने 181/6 अशी केली होती. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने ऋषभ पंतची पहिली विकेट गमावली, यानंतर इशांत शर्माही माघारी परतला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये नाबाद 89 रनची पार्टनरशीप झाली. भारताने लॉर्ड्सवर दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या हातचा विजय हिरावून घेतला. पाचव्या दिवशी लंचनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारताची इनिंग 298 रनवर घोषित केली, त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे आव्हान मिळाले. मोहम्मद शमी 56 रनवर आणि जसप्रीत बुमराह 34 रनवर नाबाद राहिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत