Johnson & Johnson's single dose vaccine approved in India
कोरोना देश

जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मिळाली मंजूरी

नवी दिल्ली : देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे. जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोस लसीला भारतात मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मांडवीय यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल, असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत