मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) क्लर्क पदासाठीच्या 5830 जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी व अर्ज करावा. या जागा देशातील विविध बँकांमध्ये भरल्या जातील. तीन वेगवेगळ्या तारखांना ही परीक्षा घेण्यात येणार असून कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे CRP च्या माध्यमातून ही पदं भरली जाणार आहेत. या भरतीसंबंधी अधिसूचना रविवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 12 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2021
पूर्व परीक्षेसंबंधी प्रशिक्षण : 16 ऑगस्ट 2021
पूर्व परीक्षेची तारीख : 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट , 4 सप्टेंबर 2021
मुख्य परीक्षेची तारीख : 31 ऑक्टोबर 2021
परीक्षेची फी : 850 रुपये
अर्ज कसा करायचा ?
१. इच्छुक उमेदवारांनी ibps.in या आयबीपीएसच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
२. होमपेजवरील IBPS Clerk Exam नोटिफिकेशनवर क्लिक करा.
३. आता न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
४. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बेसिक डिटेल्स भरा आणि यूजर आयडी, पासवर्ड जनरेट करा.
५. यूजर आयडी आणि पासवर्डसह लॉगइन करा.
६. ऑनलाइन अर्ज भरा.
७. आवश्यक ती कागदपत्रे व फोटो, स्वाक्षरी अपलोड करा.
८. ऑनलाइन शुल्क भरा आणि रिसिट डाऊनलोड करा.
९. भविष्यातील रेफरन्ससाठी भरलेल्या अर्जाची एक प्रत घेऊन ठेवा किंवा अर्ज डाऊनलोड करा.




