Former Union Minister Kumar Mangalam's wife brutally murdered in Delhi
क्राईम देश

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पीआर कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम (वय 67) यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, किट्टी कुमारमंगलम दिल्लीतील वसंत विहार परिसरात राहत होत्या. मंगळवारी (६ जुलै) रात्री ही घटना घडली आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या मोलकरणीने दार उघडलं, तेव्हा धोबी आला होता. या धोब्याने मोलकरणीला बळजबरीने बाजूच्या खोलीत नेलं आणि बांधून ठेवलं. त्यानंतर आणखी दोघेजण आले. या सर्वांनी मिळून किट्टी यांचं तोंड उशीने दाबलं, त्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

काही वेळाने मोलकरणीने स्वत:ला सोडवून आरडाओरड करण्यास सुरुवात केली, त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर रात्री 11 च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मोलकरणीचा जबाब नोंदवून घेतला, त्यानंतर वसंत विहार परिसरातच राहणाऱ्या राजू नावाच्या धोब्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे. अद्याप या हत्येमागचे कारण समोर आलेले नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत