पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीचे उत्पादन सुरुवात करण्यात आले आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करत म्हटले कि, “हा एक नवा माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील आमच्या कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली आहे.”
ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस सप्टेंबर 2021 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती.
A new milestone has been reached; this week we began our first batch of Covovax (a COVID-19 vaccine developed by @Novavax) at our facility, here in Pune. pic.twitter.com/FqoVTUa1nO
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) June 25, 2021




