पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला मोठा फटका बसला आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सरकावल्या, त्यामुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ३५२ कोटींचे) नुकसान झाले आहे.
रोनाल्डो यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याने समोर ठेवलेल्या कोका कोलाच्या दोन बाटल्या बघितल्या. त्यानंतर रोनाल्डोने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणाला.
pic.twitter.com/0iIjKJgZ73
The best Ad ever Coca-Cola can get @Cristiano ?— Sasi (@sasijayaram) June 16, 2021
परंतु, रोनाल्डोची ही कृती कोका कोला कंपनीला इतकी महागात पडली की कंपनीचे शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली आहे.
Cristiano Ronaldo’s removal of two Coca-Cola bottles during a press conference at the Euros has coincided with a $4bn fall in the share price of the drinks giant.
That’s what leadership can do ??https://t.co/O2gqIxmyZ2
— Jeroen Candel (@JeroenCandel) June 16, 2021
रोनाल्डोला सर्वात तंदुरुस्त अॅथलीट म्हणूनही ओळखले जाते. रोनाल्डो कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंकचा चाहता नाही, तो त्याच्या चाहत्यांना त्याऐवजी पाणी पिण्याचा सल्ला देतो. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला.




