देश

प्रभू रामललासाठी रत्नजडीत वस्त्र

आज अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच्या चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार पाडणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशातच राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललाला हिरव्या आणि भगव्या रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. रामललाची वस्त्र मलमलच्या कपड्यांनी तयार करण्यात आली असून या वस्त्रांवर 9 प्रकारची रत्न लावण्यात आली आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत