कोरोना देश

भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाची लागण झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच महंत नृत्यगोपाल दास हे देखील उपस्थित होते. नृत्यगोपाल दास यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नृत्यगोपाल दास सध्या मथुरेत […]

देश

प्रभू रामललासाठी रत्नजडीत वस्त्र

आज अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येच्या चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झालेले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार […]

देश महाराष्ट्र

आज बाळासाहेब असायला हवे होते, भूमिपूजनाच्या संदर्भात राज ठाकरेंकडून आठवण

आज अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. शिवसेनेसह मनसेने राम मंदिराच्या भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिपूजनाच्या पूर्वसंध्येला एक पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत आहे, या मंगलप्रसंगी ते असायला […]