sex life can increase your life span
लाइफ स्टाइल

चांगल्या आणि समाधानी सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…

कोरोना संसर्गाचा ताण लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. इतकेच नाही तर अनेक जणांच्या सेक्स लाइफवरही परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीमुळे लोकांमध्ये तणाव वाढत आहे आणि लैंगिक इच्छा कमी होत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी दाम्पत्याने आठवड्यातून किमान एकदा तरी सेक्स करायलाच हवा. अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपीस्ट्सचे क्लिनिकल फेलो आणि सेक्स थेरपिस्ट इयान केर्नर यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून एकदा लैंगिक संबंध ठेवणारे पार्टनर सर्वात आनंदी असतात आणि त्यांच्या नात्यात समाधानी असतात.

सोशल सायकोलॉजी अ‍ॅण्ड पर्सनॅलिटी सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा सेक्स करणारी जोडपी कमी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत त्यांच्या नात्यात अधिक समाधानी असल्याचे दिसून आले. तथापि, आठवड्यातून अनेक वेळा सेक्स केल्याने मात्र त्यांच्या नात्यात काहीही फरक पडला नाही, असेही आढळून आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

सेक्स लाईफ आणि वय यांच्यात काय आहे संबंध? २२ वर्षे केलेल्या संशोधनात आलं समोर…

केर्नर पुढे म्हणाले कि, सेक्स तीन प्रकारचा असतो. केवळ मनोरंजनासाठी किंवा विरंगुळा म्हणून, जोडीदाराशी जोडलेलं वाटावं आणि नातं घट्ट करण्यासाठी आणि तिसरा प्रकार म्हणजे कौटुंबिक नियोजन करण्यासाठी. असे असले तरी तिन्ही प्रकारच्या सेक्सची स्वतःची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशा परिस्थितीत, कोणत्याही एकाच प्रकारच्या सेक्सवर लक्ष केंद्रित केल्यास जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि हळूहळू लैंगिक इच्छा देखील कमी होऊ लागतात.

उदाहरण देताना केर्नर यांनी म्हटलं कि, मी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत, ज्यांनी गर्भधारणेसाठी आयव्हीएफचा वापर केला होता. प्रजननाच्या या प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर याचा सर्वात जास्त परिणाम त्यांच्या लैंगिक संबंधांवर झाला. यामुळे अनेक जोडप्यांमधील लैंगिक संबंधात घट झाली. लोक बर्‍याचदा हे विसरतात की लैंगिक संबंध केवळ मुले जन्माला घालण्यासाठीच मर्यादित नसतात, तर ते नात्यांना मजबूत करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून देखील कार्य करतात.

केर्नर यांनी अलीकडेच “टेल मी अबाउट द लास्ट टाईम यू हॅड सेक्स” नावाचे पुस्तक लिहिले आहे, ते म्हणाले, “जोडप्यांमध्ये लैंगिक संबंध असावेत असे मला वाटते. त्या बदल्यात तुम्हाला काय मिळते, ते फारसे महत्वाचे नाही.” केर्नर यांचा असा विश्वास आहे की नात्यांना समाधानकारक बनविण्यासाठी, नातं घट्ट करण्यासाठी लैंगिक संबंध आणि मनोरंजक लैंगिक संबंध आपल्या कौटुंबिक नियोजनात समाविष्ट करायला हवेत. असे केल्याने तणाव कमी होतो आणि लैंगिक संबंध दृढ होतात.

केर्नर यांच्या मते, जोडप्यांनी आठवड्यातून एकदा रिलेशनल किंवा भावनिक लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत. यामुळे आपण आपल्या जोडीदाराशी कनेक्ट असल्याची जाणीव होते आणि नाते मजबूत होते. केर्नर नेहमीच रुग्णांना सल्ला देतात की संबंध मजबूत करण्यासाठी सेक्सशी संबंधित रोमँटिक गोष्टी नेहमी एकमेकांबरोबर बोलायला हव्यात. एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा, एकत्र बाथ घ्यायला हवा. अशा काही वेगळ्या क्रिया केल्यानेही जोडप्यांमधील लैंगिक इच्छा अबाधित राहते. लैंगिक संबंधांचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सेक्स कोणत्याही दबावाशिवाय करायला हवा. त्यामुळे नाते आणखी मजबूत होते आणि भावनिक आधार देखील मिळतो.

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करताना घ्या ‘ही’ काळजी, वैद्यकीय तज्ज्ञांनी दिल्या सूचना

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत