sex life can increase your life span
ब्लॉग लाइफ स्टाइल

सेक्स लाईफ आणि वय यांच्यात काय आहे संबंध? २२ वर्षे केलेल्या संशोधनात आलं समोर…

व्यायाम आणि आरोग्यदायी आहार यासारख्या चांगल्या सवयी आपल्या आयुष्याची काही वर्षे वाढवू शकतात. या गोष्टी निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत, परंतु आता संशोधकांनी या यादीमध्ये आणखी एक गोष्ट जोडली आहे आणि ती म्हणजे शारीरिक संबंध. संशोधकांचे म्हणणे आहे की सेक्स केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका कमी होतो.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सेक्स केल्यामुळे केवळ शारीरिक समाधान मिळते असं नाही, तर यामुळे मनःस्थिती देखील चांगली राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकारापासून संरक्षण होते, ज्यामुळे आयुष्यमान वाढते. न्यू इंग्लंड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी लैंगिक संबंध आणि हृदयविकारांना जोडून एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास 65 वर्षांखालील 1120 पुरुष आणि स्त्रियांवर २२ वर्षे केला गेला. या अभ्यासाचे निकाल 22 वर्षानंतर आले असून त्यात असा दावा केला गेला आहे की दररोज सेक्स केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

अभ्यासात असे देखील समोर आले आहे कि, सक्रिय सेक्स लाईफमुळे हृदयविकाराच्या झटक्यानंतरही जिवंत राहण्याची शक्यता वाढते. अभ्यासानुसार, आठवड्यातून अनेकदा शारीरिक संबंध ठेवणारे लोक, हृदयविकाराच्या झटक्यानंतर मरण पावण्याची शक्यता 27 टक्के पर्यंत कमी होती. तर ज्यांनी कधीकधी सेक्स केला त्यांच्यामध्ये ही शक्यता केवळ 8 टक्के कमी होती.

संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा सेक्स केल्याने दीर्घायुष्याची शक्यता 37 टक्क्यांपर्यंत वाढते. असाच अभ्यास काही वर्षांपूर्वी अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये केला गेला होता. त्यात प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की जे पुरुष कमी शारीरिक संबंध ठेवतात, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका अधिक असतो. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की सक्रिय सेक्स लाईफ असलेल्या पुरुषांमध्ये शारीरिक हालचाली करण्याची अधिक क्षमता असते आणि यामुळे शरीर निरोगी राहते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत