TV actor Karan Mehra granted bail in assault case filed by wife Nisha Rawal
मनोरंजन

अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहरा याच्यावर पत्नी निशा रावलने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. त्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी करणला जामीन मंजूर केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोमवारी रात्री घरगुती वादानंतर करणने आपल्या पत्नीला भिंतीकडे ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला होता. करणविरोधात आयपीसीच्या कलम 336 आणि 337 अंतर्गत मारहाण आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या जोडप्याचे लग्न होऊन आठ वर्ष झाले आहे आणि त्यांना एक चार वर्षांचा मुलगा आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत