मुंबई : अभिनेता करण मेहरा याच्यावर पत्नी निशा रावलने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. त्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी करणला जामीन मंजूर केला आहे. सोमवारी रात्री घरगुती वादानंतर करणने आपल्या पत्नीला भिंतीकडे ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला होता. […]
टॅग: Goregaon
मुंबईच्या गोरेगाव येथील एका स्टुडिओला भीषण आग
मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील एका स्टुडिओला भीषण आग लागली आहे. शहरातील इनॉर्बिट मॉलजवळ हा स्टुडिओ आहे. आग विझविण्यासाठी आठ फायर टेंडर घटनास्थळावर दाखल झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक स्टुडिओच्या आत अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप कोणी जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.
मुंबईत उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त; सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत
मुंबई : गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात […]



