मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माता रायन स्टीफन यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय फक्त 50 वर्षे होते. रायन यांना कोरोनाची संसर्ग झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर इंडस्ट्रीमधील त्याच्या खास मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे.
रायन स्टीफन यांच्या मृत्यूची बातमी मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ चित्रपटाचे लेखक आणि निर्माता सुपर्ण एस वर्मा यांनी दिली आहे. मनोज बाजपेयी यांनीही त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सुपरन यांनी ट्वीट करून लिहिले की, “जीवन खूप क्रूर आहे. परंतु तू दयाळू होता. मला आनंद आहे की आपण काही कथांवर एकत्र काम केले, त्या लिहिल्याचा आनंद तुझ्यामुळे होता. तुझ्यावर प्रेम करणारी बरीच माणसं तू तुझ्या मागे सोडली आहेत… ”
सुपर्ण यांचे हे ट्विट पुन्हा ट्विट करत मनोज बाजपेयी यांनी लिहिले कि, “तुम्हाला ओळखणाऱ्या सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. हे खरं असू शकत नाही! माझा मित्र रायन, तुझी आठवण येईल..’
It’s so so shocking for all of us who knew this gentle soul .It really can’t be true!! I will miss you my friend RYAN ❤️ https://t.co/VDDkCMH6Kb
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) May 29, 2021
कियारा अडवाणी, वरुण धवन, दिया मिर्झा, फरहान अख्तर यांच्यासह अनेक जणांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मध्यंतरी, कियारा अडवाणी स्टारर ‘इंदू की जवानी’ आणि काजोल, नेहा धुपिया आणि श्रुती हसन यांची शॉर्ट फिल्म ‘देवी’ यामुळे रायन चर्चेत आला होता.
केआरकेचे सलमानला उत्तर, विवेक, जॉन, अरिजित हे सरळ आहेत, यावेळी चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला
शस्त्रक्रिया करून पुरुष बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री , ६ पॅक ऍब्सचे फोटो केले शेअर




