Baba Ramdev's controversial statement again, slapping his own back and criticizing the doctors
देश

बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, स्वतःची पाठ थोपटत डॉक्टरांबद्दल हीन दर्जाची टीका

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा रामदेव म्हणत आहेत कि, “कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही 1000 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. जर स्वत: ला वाचवू शकले नाहीत तर त्यांची डॉक्टरी काय कामाची? असे म्हणत त्यांनी डॉक्टरांची खिल्ली उडवली असून कोरोना लसीच्या प्रभावीपणाची देखील थट्टा केली आहे. तसेच त्यांनी स्वतःची पाठ थोपटत ते स्वतः “देवत्व” आणि “सन्मान” असलेले डॉक्टर असल्याचा दावाही केला आहे.”

पुढे बाबा रामदेव म्हणाले कि, “जर तुम्हाला डॉक्टर बनायचे असेल तर स्वामी रामदेवसारखे बना, ज्याच्याकडे कोणतीही डिग्री नाही, पण ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवीविना, देवत्व आणि सन्मान असलेला मी एक डॉक्टर आहे.”

खरं तर, गेल्या आठवड्यात इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितले होते की कोरोनाविरुद्धच्या दुसर्‍या लाटेमुळे देशभरातील २44 पेक्षा जास्त डॉक्टरांचा मृत्यू झाला. परंतु यापैकी केवळ सात डॉक्टरांना कोरोनाचे दोनही डोस देण्यात आले होते.

बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध

‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत