Arijit Singh’s mother dies of Covid-19 in Kolkata
मनोरंजन

अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

कोलकाता : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या आईचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अरिजितच्या आईला कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज (20 मे) सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरिजीत सिंग यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरु होते, परंतु तिची परिस्थिती सुधारत नव्हती. आज 20 मे रोजी सकाळी त्यांची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली ज्यानंतर डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.

दरम्यान, अरिजितच्या आईची प्रकृती चिंताजनक असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते आणि त्यांना श्वास घेण्यास देखील त्रास होत होता. अरिजीत सिंग यांच्या आईला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी आणि चित्रपट निर्माते श्रीजित मुखर्जी यांनी प्रथम दिली होती. त्यांनी अरिजीतच्या आईसाठी ‘A निगेटिव्ह’  रक्तदात्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली होती.

स्वस्तिका मुखर्जी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती आणि लिहिले होते की, ‘अरिजीत सिंगच्या आईसाठी ‘A निगेटिव्ह’ रक्ताची गरज आहे. त्यांना अमरी धाकुरिया रुग्णालयात दाखल केले असून आजच त्याची गरज आहे.’ आता त्यांची पोस्ट हटविण्यात आली आहे.

श्वेताचे दुर्दैव आहे की… राजा चौधरीची श्वेता आणि अभिनव यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया

कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत