Raja Chaudhary speaks on ex-wife Shweta Tiwari's fight with her estranged husband Abhinav Kohli
मनोरंजन

श्वेताचे दुर्दैव आहे की… राजा चौधरीची श्वेता आणि अभिनव यांच्यातील भांडणावर प्रतिक्रिया

मुंबई : टीव्ही स्टार श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा नवरा अभिनव कोहली वेगळे राहतात. लग्नात अपयश आल्यानंतर ते दोघेही त्यांचा मुलगा रेयांश याचा ताबा मिळण्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. आता या भांडणानंतर यावर श्वेता तिवारीचा पहिला नवरा राजा चौधरी याने प्रतिक्रिया दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नुकताच अभिनवने श्वेतावर आरोप केला होता की रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये भाग घेण्यासाठी श्वेताने त्यांच्या मुलाला हॉटेलमध्ये एकट्यालाच ठेवलं होतं. त्यानंतर श्वेतानेही एक व्हिडीओ शेयर केला होता, ज्यात अभिनव कोहली तिच्याकडून त्यांचा मुलगा रेयांशला हिसकावून घेत असल्याचे दिसत होते. त्यानंतर अभिनव कोहलीने अनेक व्हिडीओ समोर आणले आणि मुलगा त्याच्याबरोबर आनंदी असल्याचं सांगितलं.

श्वेताने 2007 मध्ये पहिला नवरा राजा चौधरी याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. आता राजाने अभिनव कोहली आणि श्वेताच्या नात्यात सुरु असलेल्या सर्व घडामोडींवर आपले मत व्यक्त केले आहे. राजा चौधरी याने श्वेताच्या बाजूने बोलत असे म्हटले कि, “श्वेता एक वाईट स्त्री नाही आणि खरं तर ती एक उत्कृष्ट आई आहे. तिचे दोन्ही विवाह अयशस्वी झाले आणि वादात सापडले हे खरतर दुर्दैवी आहे. दोन्ही लग्नाची तऱ्हा एकसारखीच झाली आणि म्हणूनच लोक श्वेताबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. श्वेता एक उत्कृष्ट आई आणि एक चांगली पत्नी आहे, यात काही शंका नाही. हा निव्वळ योगायोग आणि तिचे दुर्दैव आहे की तिच्याबरोबरच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे आणि तिचे दुसरे लग्नही अयशस्वी झाले आहे. परंतु यामुळे ती चुकीची किंवा वाईट व्यक्ती आहे असं नाही. ”

श्वेता आणि अभिनव कोहली यांच्यात घडत असलेल्या गोष्टींबद्दल राजा म्हणाला कि, “मी यावर काहीही बोलू शकत नाही, पण मला असे म्हणायचे आहे की श्वेताने अभिनवला त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी द्यावी. श्वेताने हे समजून घेतले पाहिजे की वडिल आपल्या मुलांना कधीही हानी पोहचवू शकत नाही आणि म्हणूनच रेयांश आणि अभिनव या दोघांना एकत्र राहण्याचा हक्क आहे.

कंगना रनौतने केले अभिनेत्री सामन्था अक्किनेनीचे कौतुक, म्हणाली…

‘भय इथले संपत नाही’ : आता पांढर्‍या बुरशीचे रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत