Kanchana 3 fame Russian actress dies in Goa
मनोरंजन

कंचना- 3 फेम अभिनेत्रीचे गोव्यात निधन, गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

तामिळ चित्रपट कंचना 3 मध्ये दिसलेली 24 वर्षीय रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा जावी हिचे निधन झाले आहे. अलेक्झांड्रा शुक्रवारी गोव्यात तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ती उत्तर गोव्यातील सिओलीम गावात राहत होती. आता गोवा पोलीस तिच्या शवविच्छेदनासाठी रशियन वाणिज्य दूतावासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्झांड्राचा मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे. ते अलेक्झांड्राचे शवविच्छेदन करण्यासाठी रशियन वाणिज्य दूतावासाच्या ना हरकत प्रमाणपत्र (NOC) ची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अलेक्झांड्राच्या प्रियकराचा जबाब नोंदवला आहे. अलेक्झांड्राचा प्रियकरही तिच्यासोबत त्या अपार्टमेंटमध्ये राहत होता आणि घटनेच्या वेळी तो बाहेर गेला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत