तामिळ चित्रपट कंचना 3 मध्ये दिसलेली 24 वर्षीय रशियन अभिनेत्री अलेक्झांड्रा जावी हिचे निधन झाले आहे. अलेक्झांड्रा शुक्रवारी गोव्यात तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ती उत्तर गोव्यातील सिओलीम गावात राहत होती. आता गोवा पोलीस तिच्या शवविच्छेदनासाठी रशियन वाणिज्य दूतावासाच्या परवानगीची वाट पाहत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्झांड्राचा मृतदेह सध्या शवागारात ठेवण्यात आलेला आहे. […]

